टॉप बातम्या

वनोजा (देवी) ग्रामपंचायत उपसरपंच पदी भंडारी यांची सर्वानुमते निवड

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर

मारेगाव : वनोजा (देवी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणूकीत प्रशांत भंडारी व सुधाकर धांडे यांचा अर्ज होता, परंतु धांडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवड नूतन लोकनियुक्त सरपंच सौ डीमन गोवर्धन टोंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी निवडणूक निर्णय म्हणून कृषी अधिकारी मेश्राम साहेब, तलाठी शिंदे, ग्राम सचिव परचाके यांनी काम पाहिले. या निवडीसाठी नूतन ग्रामपंचायत सदस्य रेखा वनकर, राधिका झाडे, वृषाली टोंगे, रमेश भोपरे, सुधाकर धांडे, सुषमा ढोके यासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच निवडीनंतर उपसरपंच यांचा सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. ग्रामविकास आघाडीचे प्रमुख नेते गंगाधर कडुकर यांच्या नेतृत्वात बंडू भाऊ पुनवटकर, गोवर्धन टोंगे, रामदासजी धांडे, संभाजी बहिरे, विजय बोढाले, श्रीराम वैद्य, प्रकाश पिदूरकर, हरिदास नगराळे, राकेश चिकटे, विठ्ठल घाटे, अनिल बहिरे, गौरव नगराळे, विनायक ढोके व नवयुवक यांच्या मार्गदर्शनात निवडणूक लढविण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रशांत प्रकाशचंद भंडारी यांनी ग्रामस्थांचे निवडीबद्दल आभार मानले. या निमित्ताने सर्व नागरिकांना नववर्षभिनंदनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व पुनःश्च आभार मानले. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();