सह्याद्री चौफेर | न्यूज
कोरोना काळानंतर प्रथमच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरिता नृत्य स्पर्धेचे आयोजन शहरातील इसपीएम हायस्कूल च्या रंगमंचकावर करण्यात आले असून अ'ब'क अशा दोन गटात नृत्य स्पर्धा होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात येतेय. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या शाळांना रंगनाथ स्वामी निधी अर्बन लिमिटेड व श्री लक्ष्मीनारायण सहकारी पतसंस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
प्रेस वेल्फेअर असोसिएशन तर्फे उत्कृष्ट नृत्यास बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रभारी शिक्षकांना देखील बक्षीसे देण्यात येणार असून या स्पर्धेत शाळांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धा संयोजक विनोद ताजणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.