सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : येथील नगरसेवकाने एका देशी दारू दुकान हटविण्याची तक्रार केली होती. यात तडजोड करित बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नव्वद हजार रुपये घेतांना ते अडकले.
लाचेच्या अटकेत असलेले नगरसेवक अनिल गेडाम यांना आज केळापूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पि.बि. नाईकवाड यांच्या न्यायालयात हजर केले असता, जामीन अर्जावर सुनवाई पूर्ण झाली नसल्याने अखेर नगरसेवकाची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.