टॉप बातम्या

बस वाहकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी आगारातील एका वाहकाचा कर्तव्यावर असतांना हृदय विकाराचा झटका आला. ही घटना चंद्रपूर येथे घडली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक किशोर घरत (अंदाजे वय 47) रा. यवतमाळ असे नाव आहे. किशोर हे राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारात वाहक म्हणून कार्यरत होते,  दि.12 जानेवारी ला वणीवरून चंद्रपूर कडे निघालेल्या बस मध्ये कर्तव्यरत असतांना पडोली जवळ त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. बस चंद्रपूर बसस्थानकावर पोहचताच  किशोर यांचे छातीतील वेदना आणखी तीव्र झाल्या यातच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कर्तव्यावर त्याचा मृत्यू झाला.
वर्षाच्या सुरुवातीलाच कर्तव्यरत शासकीय कर्मचाऱ्याला सतत पगाराची वाट बघत बसणे या विवंचनेत ते असायचे असे सहकारी कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली असून कुटुंबाचा आधारवड असलेला प्रमुख व्यक्ती असा अचानक इहलोक गेल्याने हळहळ व्यक्त होत असून घरत कुटुंबियांवर दुःखा चे डोंगर कोसळले आहे. 
                      मृतक किशोर घरत (47)
               जाहिराती संपर्क : 7218187198
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();