सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वणी उपविभागातील एकमेव "व्हॉइस ऑफ डिजिटल मिडिया" पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी काल दि.11 जाने 2023 शासकीय विश्राम गृह,वणी येथे गठीत करण्यात आली.
यात सर्वानुमते अध्यक्षपदी राजू निमसटकर,सचिवपदी अजय कंडेवार, उपाध्यक्ष राजू तुराणकर, सहसचिव प्रशांत चंदनखेडे तर कोषाध्यक्ष रमेश तांबे यांची निवड करण्यात आली.
यावेळी विश्राम गृहात कार्यकारिणीची बैठक राजू निमसटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यकारणीत संतोष पेंदोर (संघटक), ऍड.दिलीप परचाके (सल्लागार), निकेश झिलठे (सदस्य), सुनील इंदूवामन ठाकरे (सदस्य), देव येवले (सदस्य), प्रशांत जुमनाके (सदस्य)
संतोष बहादूरे (सदस्य), आनंद नक्षणे (सदस्य) या सर्वांचा समावेश आहे.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.