टॉप बातम्या

नगरसेवक आकाश बदकी यांच्या निवासस्थानी माजी मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिली व्हिजिट

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज दिनांक 28/01/2023 रोजी शनिवार ला वणी येथे विजया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल च्या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवर कार्यक्रमाचे अध्यक्ष, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजुयभाऊ बोदकुलवार प्रमुख अतिथी, डॉक्टर महेंद्र लोढा, रवीभाऊ शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

त्यानंतर लगेच सदगुरु जगन्नाथ बाबा यांच्या दर्शनासाठी सन्माननीय माजी मंत्री विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवर यांनी जगन्नाथ बाबा समाधीस्थळी भांदेवाडा जाऊन समाधीचे दर्शन घेतले व त्यानंतर मारेगांव येथील आकाश बदकी नगरसेवक यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. दरम्यान,अनेक राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा केल्या नंतर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर यांच्या सुद्धा घरी जाऊन भेट दिली.

यावेळी मार्डी चे सरपंच रविराज चंदनखेडे, प्रफुलभाऊ विकणकर, गणेशभाऊ चवले, अंकुश माफुर, यादवराव काळे, देविदास खोले, गजुभाऊ चौधरी, प्रविण कुचनकार, राजुभाऊ किन्हेकार, चेतण आवारी, विठल काळे, साहेबराव ठाकरे, सतिष गारसे, व तालुक्यातील अनेक सरपंच उपसरपंच तसेच सोसायटीचे अध्यक्ष संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post