टॉप बातम्या

महाविद्यालय स्तरीय विशेष शिबीर व जनजागृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम...

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

 जिबगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने महाविद्यालय स्तरीय विशेष शिबीर व जनजागृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शिबिराचा व सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटनिय सोहळा ग्रामपंचायत सभागृह जिबगाव येथे पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ग्रामपंचायत सरपंच यांनी शिबिराच्या माध्यमातूनन सेवेचे ब्रीद स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवल्या जात असून यावे ज्ञानासाठी व निघावे सेवेसाठी ही युक्ती या शिबिराच्या माध्यमातून खरी ठरते असे विचार मांडले यावेळी राष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून आमच्या गावाच्या विकासाला हातभार लागेल असा विश्वास सुध्दा त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे उमेश गोलेपल्लीवार सह.सरचिटणीस व्हाईस आफ मिडीया संघटना सावली तथा सह्याद्री चौफेर न्यूज कार्यकारी संपादक.सौरव गोहणे प्रसिद्ध प्रमुख व्हाईस आफ मिडीया संघटना सावली.तसेच विद्यार्थी व गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();