सह्याद्री चौफेर | नितेश वनकर
मारेगाव : मौजा वनोजा देवी येथील गेल्या वर्षभऱ्यापासून नाली भुजलेल्या अस्वस्थेत होत्या, स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने वार्ड नंबर ३ मधील नागरिकांना घाणीच्या विळख्यात असलेल्या हातपंपाचे पाणी हपसून घ्यावे लागत होते. नागरिकांनी सह्याद्री चौफेर'ला येथील समस्या बाबत सांगितले, गेल्या चार वर्षपासून "सह्याद्री चौफेर" विविध समस्या वर सडेतोड लेखणीतून भूमिका मांडून प्रशासनाला सजग ठेवण्याचा प्रयत्न करित आहे. त्याचा प्रत्यय आज दिसून आला.
काल दि.७ डिसें. रोजी वनोजा येथील एक वर्षांपासून हातपम्प घाणीच्या विळख्यात असल्याचे वृत्त उजेडात आणले, त्याची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून आज गुरुवारी येथील नाल्यातील गाळ साफ करण्याचे काम सुरु झाल्याने पिण्याच्या हातपंपा सभोवताल आता घाण, सांडपाणी साचणार नाही व दुर्गंधी सुद्धा होणार नाही अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सध्या होऊ घातलेल्या निवडणूकीत गावातील नेते पुढारी इलेक्शन मोड वर असल्याने गावातील समस्या मात्र 'जैसे थे' आहे. याकडे कोण लक्ष देणार, कोण आपल्या सोडवणार, हे येत्या निवडणुकीनंतर कळणार असून तूर्तास ग्रामवासीयांनी समाधान व्यक्त करत, असेच कार्य सातत्याने सुरु ठेवा "थँक्स" सह्याद्री चौफेर'...!