सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके
नागभीड : आ.किर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते तळोधी (बा.), ता. नागभीड येथे (प्रसिद्ध अथर्व मसाले) अथर्व फूड प्रॉडक्ट्स च्या नवीन औद्योगिक वास्तूचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच, आमदार बंटीभाऊंनी रिबीन कापून उद्घाटन केल्यानंतर प्रथमतः कारखान्यातील यंत्रसामग्रीचे विधिवत पूजन केले व उपस्थितांशी उद्योगासंदर्भात विविध विषयांवर सवांद साधला. तसेच, अथर्व फूड प्रॉडक्ट्सचे संचालक सुभाष पाकमोडे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना व्यवसायाच्या पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. सदर स्थानांतरण सोहळ्यादरम्यान अथर्व फूड प्रॉडक्ट्स च्या वतीने आमदार बंटीभाऊंचे हार्दिक स्वागत व शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी धनश्री पतसंस्थेचे सचिव डॉ.आकुलवार साहेब तसेच नागभीड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, हिलेरिया आयुर्वेद गोंदिया चे गोपेश बडवाईक, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार,माजी न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी नगरसेवक शिरीष वानखेडे, जि.प. सर्कल प्रमुख राजेश घिये, माजी जि.प. सदस्या पद्माताई कामडी, सुधीर कामडी, नरेश खोब्रागडे, मनोज हंबर्डे, भास्कर लोनबले व अन्य मान्यवर उपस्थित होते.