टॉप बातम्या

सावरगाव, वाढोणा परिसरातुन अवैध रेती वाहतूक जोमात


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : तालुक्यात अवैध रेती तस्करी वाहतुकीने कहर केला असून महसूल व पोलीस प्रशासनाकडून आर्थिक गणित डोळयासमोर ठेवून सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाला करोडो रूपयांचा चुना लागला जात आहे.

नागभिड तालुक्यातील सावरगाव, वाढोणा, येथील नदी पात्रातून व चिखलगाव घाटातील नदी पात्रातून दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळेस याच परिसरातील १० ते १२ ट्रक्टर ने राजरोसपणे रेतीची वाहतूक होत आहे. या परिसरात गोसीखुर्द खुर्द कालव्याचे व सिमेंट क्रांक्रिट रोडचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदी पात्रातून मध्यभागी रेतीचे उत्खनन करून या परिसरात सुरू असलेल्या प्लॅन्ट वर अवैध मार्गाने टाकल्या जातात. तसेच ट्रक्टर धारक सुध्दा रात्री चोरट्या मार्गाने अप्पर तालुक्यातील गावागावात सुरू असलेल्या सिमेंट क्रांक्रिट रोडचे बांधकाम साठी रेती ची तस्करी केली जात असताना कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तसेच मुख्य मार्गालगत अवैध रेती चे मोठे मोठे ठिगारे असताना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने शासनाला करोडो रूपयांचा चुना लागला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या महसूल मंत्री साहेबांनी तालुक्यात होत असलेल्या अवैध रेती तस्करी करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रेती माफियांना नेमके अभय कुणाचे अवैध रेती तस्करी करणाऱ्या वर कारवाई थंड बस्त्यात आहे. प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडविला जात आहे. वाळू माफियांना कारवाई ची भिती नाही. कुठल्याही महसूल अधिकारी वर्ग व पोलीस अधिकारी वर्गाचा वचक नसल्यामुळे दिवस रात्री रेती वाहतूक होत आहे. तसेच तस्करी करणाऱ्या रेती तस्कराकडून विना नंबर प्लेट चे ट्रक्टर ने वाहतूक होत असताना संबंधित विभाग गप्प बसला आहे. मुख्य मार्गावर वरून रेतीची वाहतूक होत असताना गस्त धारी खाकी कारवाई का? करित नाही असे सामान्य नागरिक यांच्या कडून व्यक्त केली जाते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();