टॉप बातम्या

मा खा अशोकजी नेतेंनी आज मानव-वन्यजीव संघर्ष संदर्भात मुख्य वनसंरक्षक व वनविभागाच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यात या हफ्त्यात अनुक्रमे नीलसनी पेठगाव, रुद्रापूर व खेडी येथे वाघाच्या हल्यात निर्दोष व्यक्तींचा जीव गेला.सर्वत्र हाहाकार उडाला.जन सामान्याचे जीवन विस्कळीत आले.सकाळ आणी संद्याकाळी वाघाच्या भीतीमुळे दहशतीमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले.विदयार्थी,शेतकरी बेहाल झाले.जंगल व ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण झाले.करीता मा खा अशोक जी नेते यांनी वन विभागातील अधिकारी यांची गोसेखुर्द रेस्टहाऊस सावली येथे बैठक घेतली त्यात श्री.खाडे ( डी.फ.ओ) चंद्रपूर व श्री.विरुटकर(आरफओ,सावली यांना वाघाना जेरबंद करण्यासाठी सूचना दिली.गावशीवरात कोणत्याही वन्यप्राण्यांची घुसखोरी व त्यामुळे होणारी टाळण्यासाठी लवकरात लवकर वनविभागातर्फे उपाय योजना करण्याचे सांगितले व कुटुंबाना त्यांनी सांत्वना देत आधार दिला. रुद्रापूर येथील श्री.बाबुराव कांबळे, खेडी येथील सौ.स्वरूपा येल्लटीवार वाघाच्या हल्यात मृत पावले होते.आज त्यांचा कुटुंबाना त्यांनी भेट देत आधार दिला. तथा रुद्रापूर खेडी, येथे भेटी दरम्यान उपस्थित अविनाश पाल भा ज पा ता अध्यक्ष सावली, सतीश बोम्मावार भाजपा ता. महामंत्री तथा नगरसेवक सावली,सौ निलमताई सुरमवार भा ज पा महीला जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवीका सावली,सौ छायाताई शेंडे माजी उपसभापती प स सावली, आशिष कार्लेकर भा ज पा शहर अध्यक्ष सावली, मा.बोरकर साहेब पोलिस निरीक्षक सावली .निखील सुरमवार,गित्तेश चिताडे, वन अधिकारी साहेब व त्या गावातील स्थानिक नेते, कार्यकर्ते व गावातील लोक उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();