सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : आपल्या खास वऱ्हाडी शैलीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत विदर्भ व अख्खा महाराष्ट्रात तरुणाईमध्ये "खद खद मास्तर" म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे आता प्रथमच मारेगाव (रोड) येथे येणार आहेत.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, तथा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव संयुक्त विद्यमाने प्रा नितेश कराळे सर (वर्धा) यांची मारेगाव येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
ज्वालामुखीतून लाव्हा रस कसा बाहेर पडतो. तर तो खद खद खद बाहेर पडतो, अशा खास वऱ्हाडी शैलीत MPSC च्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आणि त्यामुळेच विदर्भ व महाराष्ट्रात तरुणाईमध्ये "खद खद मास्तर" म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे आता मारेगाव नगरीत येणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष अॅड. देविदास काळे (अध्यक्ष रंगनाथ स्वामी पतसंस्था, वणी), डॉ महेंद्र लोढा (लोढा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, वणी) हे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अविनाश घरडे (कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव) तर प्रमुख अतिथी श्री केशवजी सवळकर (विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ), श्री अनिलजी राठोड (जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ), हे उपस्थिती आहेत.
येत्या २५ डिसेंबर २०२२ रोज रविवार ला सकाळी १०. वाजता येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सभागृह, मारेगाव येथे कार्यक्रम होणार आहे. कोरोना आला आणि वर्गात बसवून पारंपरिक पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीला ब्रेक लागला. तेव्हा पर्याय म्हणून सुरु झालेल्या ऑनलाईन शिक्षणात अनेक शिक्षकांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून रंजक बनविले. त्यापैकीच एक वर्ध्यातले नितेश कराळे. ज्वालामुखीतून लाव्हा रस कसा बाहेर पडतो.
इथपासून तर मराठीतल्या स्वर आणि व्यंजनांचा अचूक उच्चार करताना जिव्हा कशी वळवावी लागते हे सर्व खास वऱ्हाडी-गावरान शैलीत विद्यार्थ्यांना शिकवणारे कराळे गुरुजी त्यांच्या खास शैलीतील शिकवणुकीमुळे युट्युब आणि इतर समाज माध्यमात खद खद मास्तर म्हणून प्रसिद्ध झाले. आज तेच कराळे सर तालुक्यातील तरुणाईच्या मनातील खद खद दूर करण्यासाठी मारेगाव शहरात येत आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना हजर राहण्याचे आवाहन मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, तथा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव यांनी केले आहे.
