टॉप बातम्या

आज होणाऱ्या चक्काजाम आंदोलन'ला स्थगिती- काँग्रेस नेते संजय खाडे यांची माहिती

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आज दि 21 डिसेंबर रोजी बोरगाव फाटा व उकणी खान बंद विरोधात चक्काजाम आंदोलन होणार होते. परंतु मा. खासदार बाळूभाऊ धानोरकर तसेच कुशल ईगल प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक यांचेमध्ये सुशिक्षित बेरोजगार उकणी व परिसरातील तसेच कुशल व अकुशल कामगार नोकरीवर घेण्याबाबत वरील तारखेला चक्काजामची नोटीस देण्यात आली होती.
   (25 डिसेंबर ला प्रा नितेश कराळे सर (वर्धा) मारेगावात)

खासदार धानोरकर व ईगल प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक तसेच माजी सरपंच उकणी संजय खाडे व इतर यांच्यामध्ये या समस्येबाबत बैठक बोलावून बेरोजगारांना कंपनीमध्ये नोकरी देण्याचे व उकणीसहित परिसरातील लोकांना लवकरात लवकर रोजगार देणेबाबत कंपनी व्यवस्थापक यांनी माननीय खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी सरपंच संजय खाडे व इतर लोकांसमक्ष ठोस असे आश्वासन दिल्यानंतर आज बुधवारला होणारे उकणी खदान बंद व चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
(नऊ डिसेंबरला कंपनी व्यवस्थापकला निवेदन देताना खाडे)

यानंतर दिलेला शब्द जर कंपनीने न पाळल्यास तर भविष्यातसुद्धा तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन केल्या जाईल. असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे,अशी माहिती काँग्रेस नेते संजय खाडे यांनी दिली.
Previous Post Next Post