सह्याद्री चौफेर : कुमार अमोल
पुसद येथील हल्ल्याचा वणी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून निषेध नोंदविला. कर्मचाऱ्यांनी यावेळी नारेबाजी करून हल्ला करणाऱ्या अतिक्रमणधारकावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.
पुसद नगर पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले असतांना या हल्ल्याचा निषेधार्थ वणी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला असून या हल्ल्याचे वणीत पडसाद उमटले.
पुसद नगर पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद वणीत उमटले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 23, 2022
Rating:
