सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
मारेगाव : तालुक्यातील 18 डिसेंबर रोज रविवार 2022 रोजी 9 ग्रामपंचायती च्या निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीचा निकाल आज दि.20 डिसेंबर 2022 मंगळवारला 1 वाजेपर्यंत लागणार असल्याने गावचा सरपंच कोण होणार हे कळणार आहे.
मारेगाव तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित होताच पॅनल प्रमुखांनी उमेदवार निवड करतांना मोठी कसरत केली तसेच सरपंच ते सदस्य पदांचा उमेदवार शोधताना चांगलीच दमछाक झाली. नामनिर्देश मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारांनी पॅनल प्रमुखांना घाम फोडला असून निवडणुकीतही मोठी दुहेरी तर कुठे तिरंगी रंगत आली होती.
रविवारला निवडणूक प्रक्रिया सुरूवात होताच सकाळपासून मतदार केंद्रावर गर्दी दिसत होती. दुपार पासून निम्यावर अधिक मतदान झालेत. तर काही शिल्लक रसद मिळण्याची सायंकाळपर्यंत प्रतीक्षेत होते. एकदाचे मतदान पार पडले अन नऊ ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाल्यानंतर सुरू झाले गणितं...