टॉप बातम्या

सिर्शी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या....

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : सावली तालुक्यातील सिर्शी येथील शेतकरी सखाराम पुंजाजी निकुरे वय 65 वर्ष यांनी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. निसर्गाच्या लहरीपणामुळे गरजा भागवण्यापुरते तरी उत्पन्न होईल की नाही, किंबहुना होणारच नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी ह्या विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.       

अधिकरावांनी शेतीसाठी बँकेचे कर्ज घेऊन शेती केली, मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतीचे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. ह्या विवंचनेतूनच त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, चार विवाहित मुले, एक मुलगी, नातवंड व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();