सह्याद्री चौफेर | राजू डावे
वन विभागाने परिसरातील परिस्थिती बघता,वाघाला जेरबंद करण्याकरिता कोलेरा व पिंपरी परिसरात चाळीस कर्मचारी, ट्रॅप कॅमेरे, जागोजागी पिंजरे लावले. शोध मोहीम सुरु असतांना वाघ आढळताच वाघाला डॉट मारून बेशुद्ध करित आज बुधवारला सकाळी हा नरभक्षी वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने वन विभागाबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तालुक्यात प्रचंड वाघाची दहशत निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांना सातत्याने वाघ आढळून येत होते. अनेकांची जनावरं वाघाने फस्त केली. एवढेच नाही तर वाघ नरभक्षी झाला होता. त्याने दोन इसमाच्या शिकार केल्या, तर एका वर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. या वाघाच्या हल्ल्यात भुरकी येथील अभय देऊळकर (25) व कोलेरा येथील रामदास पिदूरकर (58) या दोघांचा नाहक बळी गेला. तर ब्राह्मणी येथे टॉवरचे काम करणारा उमेश पासवान या परप्रांतीय कामगारांवार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.
रब्बी हंगाम शेतकरी, मजूर भयभीत असल्याने परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने शोध मोहीम राबवून मागील काही दिवसांपासून वन विभागाला हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघाला अखेर कोलार (पिंपरी) कोळसा खाणीच्या सब स्टेशन जवळ त्यास जेरबंद करण्यात रेस्क्यू पथकाला यश आले. त्याला गोरेवाडा येथे रवानगी होत असल्याचे समजते.
या नरभक्षी वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केल्याने वन विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.