टॉप बातम्या

शिरपूर येथील श्री गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : श्री गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री. मोतीराम परचाके हे होते . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रुपेश धुर्वे यांनी केले. या वेळी शाळेतील शिक्षक प्रा. गणेश लोहे, प्रा.वासुदेव ठाकरे, पर्यवेक्षक श्री. किशोर उमाटे, संजय बोधे, चंद्रकांत फुलझेले यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. मो.ल.परचाके यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. योगेश किन्हेकर यांनी केले तर आभार प्रा.वासुदेव ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सुधीर वटे, सौ.छाया पिदूरकर, प्रा.सौ.सिमा सोनटक्के, श्री.नंदकिशोर शेडामे, श्री.राजुभाई गेडाम, लिपिक श्री. सचिन पुनवटकर, वसंतराव गिलबिले, सतिश गुरुनुले, उमेश लिंगमे यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post