टॉप बातम्या

अवैध दारूविक्री बंद व्हायचं नावच घेत नाही - पुन्हा मच्छिन्द्रा येथील धाडसी महिलांनी पकडली दारू

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे गेल्या अनेक दिवसापासून अवैध दारूची विक्री केली जाते, त्यामुळे युवकांवर, विद्यार्थ्यावर मोठा परिणाम होत असून अनेकांना व्यसन जखळले आहेत. उठल्या खाटेवर तळीरामाची रेलचेल अगदी शाळे लगत असते. त्यामुळे बालक पालकात तीव्र संतापाची लाट आहे. शिवाय या दारुमुळे घरात भांडण तंटे, महिलांना रोजरोजची कटकट सहन करावी लागत आहे. 
ऐसेही चर्चा ऐकण्यात आहे की, लहान सहान मुलांना थंड पेय च्या माध्यमातून मदिरा कोल्ड्रिंक्स म्हणून पाजण्यात आली. ह्या मुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करित या अवैध दारू विक्री च्या विरोधात दंड थोपटले असून मागील महिन्यात येथील महिलांनी पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू पकडली व त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ही अधून मधून गावात दारू विकली जात असतांना आज मंगळवारी पुन्हा महिलांना गावालगत एका शेतात दारूची पेटी असल्याचे समजले, सदर अवैध दारू नांदेपेरा मार्गे देवी वरून थेट मच्छिन्द्रा येथे पोहचवला जात असतो. या मालाची कुणकुण लागताच गावातील महिला, युवक, नवनिर्वाचित पेसा अंतर्गत समितीचे पदाधिकारी व नागरिक शेतात धडकले आणि शोधाशोध करून दारूची पेटी ताब्यात घेतली, मात्र विक्रेता पसार झाल्याचे महिलांनी सांगितले. याबाबत पोलीस पाटील यांना माहितीस्तव संपर्क साधण्यात आला परंतु त्यांना संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे वृत्त लिहपर्यंत कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र, आज गावातील महिला युवक तसेच समितीचे पदाधिकारी मारेगाव पोलीस ठाण्यावर धडकणार असल्याचे माहिती आहे. तूर्तास इतकं सगळं पिच्चर क्लिअर असून येथील (विक्रेता, पुरवठा करणारा आणि माल) अवैध दारू विक्री का? बंद होतं नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
आज मात्र, या महिलांच्या धाडसी धाडी कडे आता ठाणेदार काय कठोर पाऊल उचलतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();