टॉप बातम्या

चिंचमंडळ येथील तस्कर कोसारा घाटात प्रशासनाच्या जाळ्यात

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : चार दिवसांपूर्वी दोन वाळू तस्करांना महसूल विभागाने ताब्यात घेतल्यानंतर मुजोर तस्करांनी हा अवैध कायम ठेवला. मात्र, प्रशासन माध्यमाचा धसक्याने ऍक्शन मोड वर येत पथक कार्यान्वित केले आणि सोमवार च्या रात्रीला रेती तस्करांचा "रात्रीस खेळ चाले" हा उजेडात आणला.
चिंचमंडळ येथील अनिकेत झाडे तस्कराचे ट्रॅक्टर वाहन रंगेहात पकडून जप्त केले. मागील अनेक दिवसापासून रेती तस्करांची टीम कोसारा, चिंचमंडळ येथे धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा महसूल घशात घालत असल्याचे चित्र सर्वश्रुत आहे.
    
हा गोरखधंदा सुकर करण्यासाठी अनेक तस्करांनी राजकीय पक्षात प्रवेश करीत आसरा घेतला, तर पुष्पा नाम हैं मेरा म्हणत लोकसेवेचा आव आणत फिरतात. 
    
दरम्यान, महसूल विभाग पूर्णतः ऍक्शन मोडवर येत वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. कोसारा आणि चिंचमंडळ घाट तस्करांच्या अजेंड्यावर असतांना तस्करांनी चिंचमंडळ पासून अवघ्या तीन किमी अंतरावरील चक्क वर्धा नदीच्या पायथ्याशी मुरूम टाकीत रेती तस्करीची वाट शोधली आहे.
    
पोलीस पथक ही रवाना

सोमवारच्या रात्री लक्ख अंधारात महसूल पथकाने एका ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केल्याने तस्करांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी थेट तहसीलदार दिपक पुंडे यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेत पोलीस पथक कोसारा घाटात रात्री 10.30 वाजता दाखल झाले होते. परिणामी महसूल विभागाने पुन्हा एका वाहनावर जप्तीची कारवाई करीत गर्भित इशाऱ्याचे संकेत दिले आहे. सदर पथकात नायब तहसीलदार अरुण भगत, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आदींनी कोसारा घाटातील मिशन फत्ते केले.
जाहिरातीसाठी संपर्क : 7218187198
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();