टॉप बातम्या

कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव चा विध्यार्थी मोक्षान्त लेनगुळेची कराटे मध्ये विभागीय स्पर्धे साठी निवड


सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : काल यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय 19 वर्षाखालील खेळामध्ये कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगावचा 11 वि विज्ञान शाखेचा चा विध्यार्थी मोक्षान्त प्रशांत लेनगुळे याने कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळावीला आहे. त्यामुळे त्याने प्राप्त केलेल्या यशामुळे त्याची निवड विभागीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे. त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
मोक्षान्त हा मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील रहिवाशी आहे. त्याला मुळातच लहान पणा पासून कराटे मध्ये आवड असल्यामुळे तो नियमित पणे सराव करत होता. त्यामुळे त्याच्या कठीण मेहनतीचे त्याला फळ मिळालं. आज झालेल्या स्पर्धेत त्यांने प्राप्त केलेल्या यशातून ते निदर्शनास येते.
त्याने त्याच्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर प्रा. चिंचोलकर सर व प्रा.ए. एन.चोपणे सर निलेश बेंडे सर, तसेच त्याच्या कुटूबियांना दिले आहे .
मोक्षांत ने मिळवलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे व प्राचार्य हेमंत चौधरी सर यांनी मोक्षांत चे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();