सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या सरपंच व सदस्यांची निवड झाली. आनंद उत्सव साजरा करित "केक" कापला गेला. आता मात्र, उपसरपंच निवड होणे बाकी आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांची अपेक्षा आहे, ती केवळ विकासाच्या लॉलीपॉप न दाखवता काहीतरी जनहिताच्या सोयी सुविधा आणि ऍडव्हान्स विकास कार्य केले पाहिजे याकडे गावकरी टक लावून आहे.
या निकालात नवख्यांना अनेक ठिकाणी संधी मिळाली तर काही गावात "जैसे थे" आहे. त्यामुळे जनहितार्थ कामे यावरच प्रणित राजकीय नेत्यांचे भविष्य ठरणार आहे. किंबहुना ज्यांच्या हातात पुन्हा कारभार दिला तिथे विकासाची गंगा वाहते की, नागरिकांना पुढची वर्ष वाट पुन्हा पाहावी लागतेय का..! याकडे नजरा लागल्या आहे.
मारेगाव तालुक्यात चुरशीची समजली जाणारी वेगांव, गौराळा, हिवरी, नवरगाव, वनोजा, कानडा, कोसारा, ग्रामपंचायत यामध्ये 'महिलाराज' आले तर शिवणी येथे नवख्या व मार्डी सरपंच पदी "ओल्ड इज गोल्ड" यांनी विजयी मिळविला.
मात्र, या अनुषंगाने सोशल स्टेटस'च्या माध्यमातून टिकेच्या ठिणग्या उठताना दिसून आल्या. जसे "पैसा जिंकला, मदत हरली"... हा जणू ट्रेंड जोमाने ट्रेंड्स च होत होता.
आता प्रश्न असा आहे की, बऱ्याच ग्रामपंचायत हद्दीत नानाप्रकारे अवैध धंदे पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या नाकावर टिच्चून चालतात. हे वेगळं सांगायची गरज नाही. हे सर्वश्रुत आहे. परिणामी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच पोलीस प्रशासन यावर कोणती भूमिका घेतात? याकडे गावागावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
'तो..ती'.. निवडून आले अन आज आनंदी आनंद झाला, मतदारांचा कौल नवख्याकडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 22, 2022
Rating:
