टॉप बातम्या

🔯 राशीभविष्य : २२ डिसेंबर गुरुवार..!



               राशीभविष्य : २२ डिसेंबर गुरुवार..!

🐏 मेष
आज तुमची खास इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने आनंदात असाल. मित्राच्या घरी जाण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध रहा. आजचा शुभ रंग - नारंगी. 

🦬 वृषभ 
विनाकारण चिंता करू नका. वायफळ खर्च टाळा. वाद-विवाद टाळा. अतिरिक्त धन सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करा. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी. 
👩‍❤️‍👨 मिथुन 
विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील. तुमच्यातील लिडरशिप क्वॉलिटी करिअर चांगले बनवण्यासाठी फायदेशीर होईल. संपत्तीत गुंतवणूक कराल. आजचा शुभ रंग - पिवळा. 

🦀 कर्क 
अचानक प्रवासाचं नियोजन केल्यास थकवा जाणवण्याची शक्यता आहे. आज गुंतवणूक करणं टाळा. संपत्तीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास थंड डोक्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - लाल. 
🦁 सिंह 
हाती घेतलेले काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. व्यापाऱ्यांना कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यावी लागेल. व्यापारात मोठा नफा होईल. आजचा शुभ रंग - निळा. 

👧🏻 कन्या 
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. योग आणि अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. परदेश दौरा होण्याची शक्यता आहे. नव्या योजना बनवाल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
⚖️ तूळ 
इच्छाशक्ती कमी असल्याने भावनात्मक आणि मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल मात्र, त्यासोबतच उत्पन्नातही वाढ होईल. नातेवाईकांकडे येणं-जाणं होऊ शकतं. आजचा शुभ रंग - केशरी आणि लाल. 

🦂 वृश्चिक 
आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आई-वडिलांसोबत मंदिरात देव दर्शनाला जाल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल. 
🏹 धनु 
आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक करण्याच्या संदर्भात इतरांचा सल्ला घेण्याऐवजी स्वत: थोडा अभ्यास करुन मगच निर्णय घ्या. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - पिवळा आणि नारंगी. 

🦐 मकर 
कामात आणि व्यापारात प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची संकेत आहेत. व्यापारात वृद्धी होईल आणि धनलाभ सुद्धा होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.  
🍯 कुंभ 
नव्या नोकरीची संधी चालून येईल. तुम्हाला भेडसावत असलेल्या समस्यांवर लवकरच तोडगा निघेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा. 

🦈 मीन 
सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. मेहनतीच्या जोरावर तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
                जाहिराती संपर्क -7218187198
Previous Post Next Post