सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांना 1982/84 ची जुनी पेन्शन योजना बंद करून शेअर मार्केटवर आधारित nps योजना लागू केलेली आहे. ज्यात पेन्शनची कुठलीही हमी नाही. यामुळे 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांच्यात महाराष्ट्र शासनाविरुद्ध कमालीचा असंतोष दिसून येत आहे. Nps योजनेतील 3000 च्या वरती कर्मचारी आज मृत झालेले आहे तरी त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही त्यांचे परिवार आज हलाखीचे जीवन जगत आहेत. या सर्व मृत कर्मचारी आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी यांना 1982/84 चीच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून गेल्या 7 वर्षांपासून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना लढत आहे. 19 डिसेंबर 2022 ला हिवाळी अधिवेशन सुरु झालेले आहे या अधिवेशनावर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पेन्शन संकल्प यात्रा काढत असून या यात्रेचे स्वरूप तीन टप्प्यात असून पहिला टप्पा 25 डिसेंबर 2022 बापू कुटी सेवाग्राम ते बुटीबोरी बाईक रॅली, दुसरा टप्पा 26 डिसेंबर 2022 बुटीबोरी ते खापरी पायी पेन्शन मार्च, तिसरा टप्पा 27 डिसेंबर 2022 खापरी ते नागपूर विधानभवन पायी पेन्शन मार्च असे आहे. नुकतीच जुनी पेन्शन योजना लागू केल्यास शासनावर दिवाळखोरी ची वेळ येईल असे अधिवेशनात मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा संघटनेकडून निषेध करण्यात येत असून येत्या निवडणुकीत voteforops या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन सरकारला वठनीवर आणूया तत्पूर्वी पेन्शन संकल्प यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सावली तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांची विधानभवनावर पेन्शन संकल्प यात्रा....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 22, 2022
Rating:
