सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : सावली तालुक्यातील तिन दिवसातील तिसरी घटना घडली असून, कापूस वेचणीसाठी गेलेल्या स्वरूपा प्रशांत येलट्टीवार (वय 50) ही महीला पोटाची खडगी भरण्यासाठी कापुस वेचणी साठी गेली होती परंतु नरभक्षक वाघाने तिच्यावर हल्ला चढवुन ठार केले.
आणखी किती लोकांना ठार करणारं? रोजच घटना घडत आहेत. याकडे वनमंत्री विशेष लक्ष्य देतील काय की निव्वळ वन विभागाला बंदोबस्त करण्याचे फर्मान सोडून निव्वळ मलमपट्टी लावतील. का? काही ठोस कार्यवाही करतील याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनाचे लक्ष लागलेले आहे.