टॉप बातम्या

राहुलजींच्या भारत जोडोत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
7218187198

यवतमाळ : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत देशातील प्रगतीशिल आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, साहित्यिक, कलावंत, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. आज वणी येथील जनसंपर्क कार्यालय येथे वणी, आर्णी मतदार संघातील प्रमुख सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेस नेते जितेंद्र मोघे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव नरेंद्र ठाकरे, महिला काँग्रेस जिल्हाअध्यक्ष वंदना आवारी, काँग्रेस तालुका अध्यक्ष वणी प्रमोद वासेकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष झरी आशिष कुळसंगे, मारोती गौरकार, माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, पलाश बोडे, रमन डोये, संजय खाडे यांची उपस्थिती होती. 
      

या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहे. भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमण करणार आहे. 

या यात्रेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
Previous Post Next Post