सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
9011152179
मारेगाव : आज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 ला आम आदमी पार्टीची मारेगाव तालुका व शहर समिती घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी विदर्भ समिती च्या वतीने श्री वसंत ढोके, यवतमाळ जिल्हा संयोजक, यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुका समिती ची घोषणा करण्यात आली आहे.
यात सचिन वासेकर (तालुका संयोजक), अरुण गवळी (उपसंयोजक), अनिल तामगाडगे (सहसंयोजक), शेख दिलदार शेख सिकंदर (सहसंयोजक), देविदास भोयर (सचिव), प्रकाश हजारे (सहसचिव), प्रवीण परेकार (संघटनमंत्री), आदित्य गाडगे (कोषाध्यक्ष),
गौरव ढेंगळे (शेतकरी आघाडी), निखिल काकडे (वाहतूक आघाडी), प्रकाश मत्ते (व्यापारी आघाडी), प्रा. गजानन देवाळकर (शिक्षण आघाडी), सौ.सुचिता कुमरे (महिला संयोजक), सौ. हिना वानखेडे (महिला सचिव), सदस्य विवेक मस्की, सदस्य सतीश शेंडे, सदस्य अंकुश तुराणकर, सदस्य विजय जोगी, सदस्य रामू गायकवाड, मीडिया प्रभारी सचिन मेश्राम यांची निवड करण्यात आली. अशी माहिती आम आदमी पार्टी चे विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांनी दिली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.