राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा शंकर कोडापे सुवर्ण व रजत पदकाचा मानकरी

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : गोंडवांना विद्यापीठांतर्गत वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात सुरू असलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी खेळ स्पर्धेत स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बि.ए. व्दितीय वर्षाचा विद्यार्थी शंकर मल्लेश कोडापे या विद्यार्थ्यांने हातोडा फेक या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गोळा फेक स्पर्धेमध्ये रजत पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. सावली तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शंकर कोडापे या विद्यार्थ्यांने विद्यापीठाच्या स्पर्धेत क्रमशा सुवर्णा व रजत पदक प्राप्त करणाऱ्या शंकरला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. भास्कर सुकारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शंकर कोडापे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार आणि महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा शंकर कोडापे सुवर्ण व रजत पदकाचा मानकरी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा शंकर कोडापे सुवर्ण व रजत पदकाचा मानकरी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.