सह्याद्री चौफेर | राजू डावे
9767918006
वणी : वसंत जिनींग अँड प्रेसिंग फॅक्टरीची निवडणूक अतिशय चूरशीची झाली होती. तिहेरी झालेल्या या लढतीत वामनराव कासावार यांच्या परिवर्तन पॅनलने शेवट च्या क्षणी बाजी मारून 17 पैकी 15 निवडून आले.
या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे याचा पेच पक्षश्रेष्ठीना पडला होता. आज मंगळवारी वसंत जिनींग येथे अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत आशिष खुलसंगे यांचे नाव अध्यक्ष पदाकरिता ठेवण्यात आले तर उपाध्यक्ष पदी जयकुमार आबड यांची निवड करण्यात आली असून कार्यकारी संचालक पदी प्राध्यापक शंकर वऱ्हाटे यांचे नाव निश्चित करण्यात आले.