सह्याद्री चौफेर | न्यूज
7218187198
मारेगाव : करणवाडी ते खैरी मार्गांवरील जड वाहतूक सुरु असल्याबाबत मा. तहसीलदार पुंडे यांच्या मार्फत संबंधित विभागाला दिनांक 9 नोव्हेंबर 2022 ला मनसे तालुका प्रमुख अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात "स्मरणपत्र" देण्यात आले होते.
परंतु निवेदन देऊन सुद्धा अद्यापही यावर संबंधित विभागाने दखल किंबहुना कुठलाही तोडगा काढण्यात आला नसल्याने उद्या बुधवार दि.23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणवाडी ते खैरी रस्त्यावर कोणत्याही क्षणी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे मनसे तालुका प्रमुख अविनाश लांबट यांनी सांगितले. तसेच मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, मनसैनिक व नागरिकांना या "चक्का जाम" आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.