सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : करणवाडी ते खैरी मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून त्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेवून येजा करावे लागत असून या मार्गांवर एक प्रकारे कसरत करावी लागत असताना महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने यावर दखल घेतली नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात बुरांडा येथे चक्काजाम आंदोलन करून रस्ता रोको केले.
तालुक्यातील बुरांडा येथे मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक अडवून धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रक व वाहनांच्या ररांगा लागलेल्या पहायला मिळाल्या होत्या, मात्र इतर जड वाहन धारक चालकांना या आंदोलनाची कुणकुण लागताच त्यांनी आपला मार्ग बदल्याचे दिसून आले.
तालुकाध्यक्ष अविनाश लांबट व कार्यकर्ते सदर मार्गावर रात्रभर देखरेख करत उभे असताना वाहन चालकांनी आपली वाहने दुसऱ्या मार्गावर वळूवून पळ काढला.
सदर मार्गावर रोज सायंकाळी महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक आपली अचूक भूमिका बजावणार असून आजपासून या मार्गाने कुठल्याही प्रकारची जड वाहतूक चालणार नाही आणि मध्यरात्री आमच्या लक्षात आले की, जड वाहतूक सदर रस्त्याने येत आहे तर वाहन तोडफोड करण्यात येईल असा दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलतांना सांगितले.