7218187198
वरोरा : दि.८/११/२०२२ रोजी सुमेध ऍग्रो ट्रेडर्स च्या वतीने अंकुर हरीश बीजी-२ पिक पाहणी कार्यक्रम सुमेध ऍग्रो शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि कपाशी वरील किड व रोग तसेच अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल या विषयी सुमेध ऍग्रो ट्रेडर्स तर्फे दरवर्षी मार्गदर्शन केले जाते. दि.८ रोज मंगळवारला श्री शंकर वऱ्हाटे रा. चिकणी यांच्या शेतात अंकुर हरीश बीजी-२ या वानावर कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी लोकांना प्रत्यक्ष अंकुर प्रक्षेत्र दाखवून रोग व किडींची ओळख करून खतांचा सूत्रबद्ध वापर, आणि औषधंविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. वरील कार्यक्रमात प्रगतीशील शेतकरी शंकर पाटील वऱ्हाटे, रोशन घोसरे, अमोल मसाडे, यांना फवारणी पंप देऊन सुमेध तर्फे गौरव करण्यात आला.
तसेच प्रगतीशील शेतीची कास धरणारे श्री बाबाराव देऊळकर, पुंडलिक बोबडे, बंडू आपटे, केशव आपटे, मारोती आपटे, अनिल सोमलकर, सुधाकर खिरटकर, विकास घोसरे, कमलाकर दरेकर, माणिक भाऊ डुकरे, गुणवंत दातारकर, यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञान आणि सुधारित शेतीची गोडी लागावी हाच प्रामाणिक प्रयत्न ठेवून "सुमेध ऍग्रो ट्रेडर्स" वरोरा वाटचाल करित आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाला अंकुर सिड्स चे टी एस एम श्री प्रवीण भोयर, ट्रॉफीकल कंपनी चे विक्री अधिकारी श्री संगीत काळे, पारिजात कंपनी चे वैद्य साहेब, सुमीटोमो कंपनीचे रमेश देठे, यांनी शेतकऱ्यांना शेती विषयक मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य श्री पंढरी पा. देहारकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुमेध ऍग्रो ट्रेडर्स च्या टीमने अथक परिश्रम घेवून योग्य नियोजन व मार्गदर्शन करून उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार मानले. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.