सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : जड वाहतुकीसाठी खैरी वडकी मार्गे करंजी हा मुख्य रस्ता दिला आहे. तसा जिल्हाधिकारी यांचा आदेश असतांना देखील मुजोर वाहन चालक मार्डी-मारेगाव ह्या रस्त्याने वाहतूक करित असल्यामुळे सदर रस्त्याने होणारी अवैध जड वाहतूक बंद करावी अशी मागणी नगरसेवक आकाश बदकी यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून आज शुक्रवार रोजी शहरातील नागरिकांनी केली.
मार्डी ते मारेगाव ह्या रस्त्याने रात्रीच्या दरम्यान, मोठ्या प्रमाणात अवैध जड वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था बघता बिकट झाली असून अपघाताची शक्यता बळावली जात आहे. या मार्गाने होणारी वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी शहरातील नागरिकांची आहे. मारेगाव तालुक्यातील मार्डी ते मारेगाव मुख्य रस्ता असून या दहा किमी अंतराच्या रस्त्याने मोठी वाहतूक असते. अशातच ही जड वाहतूक सुरु झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय शाळा, कॉलेज, मारेगाव शहरातील बाजारपेठ याच रस्त्यावर वर्दळ असल्याने या जड वाहतुकीने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मार्डी मारेगाव रस्त्याने होणारी अवैध जड वाहतूक ही नकोच असल्याने संबंधितांनी निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी, दखल न घेतल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात अशा ईशाराही देण्यात आला. यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल..!
निवेदन देताना नगरसेवक आकाश बदकी, राहुल चौधरी, प्रवीण काळे, अंकुश माफूर, पंकज पिदूरकर, निलेश बेंडे, प्रमोद दूधकोहळे, अतुल चौधरी, बळीराम आत्राम, राजू कापसे, लटारी करमनकर, आशीष मस्की सतीश शिंदे, पुरुषोत्तम खोले, बाबाराव कडू, गजानन बल्की यांचे सह मारेगावातील नागरिक होते.