टॉप बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : सन्माननीय. राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन राज्य उपाधक्ष मा. राजुभाऊ उंबरकर व जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ रोगे यांच्या प्रमुख उपस्थित, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्या नेतृत्वात शेकडो येथील गोंडबुरांडा वासियांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत भव्य पक्ष प्रवेश केला तसेच गोंडबुरांडा येथे राजू भाऊंच्या हस्ते दोन शाखेचे उ्दघाटन मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी दीडशे ते दोनशे नागरिकांनी जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष लाभेश खाडे, उप-तालुका अध्यक्ष वामन चटकी, विभागीय अध्यक्ष प्रवीण नान्हे, वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे, सर्कल अध्यक्ष गणेश खुसपूरे, प्रशांत चौधरी, वसंता घोटेकर व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
(राज्य उपाधक्ष मा. राजुभाऊ उंबरकर यांचे हस्ते शाखा फलकाचे अनावरण करताना उपस्थित मान्यवर)

गोंड बुरांडा येथील अनिल पारखी, प्रेमानंद दानखेडे उप सरपंच विजय राजूरकर, विजय दानखेडे, शंकर खोके, पंकज गमे, शेखर अंड्रस्कर, नरेश बोंद्रे यांच्या सह शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();