सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर स्मृती कला महाविद्यालय शिरपूर येथे आज दिनांक : १८/१०/२०२२, रोजी पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सत्र २०२०-२१ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आल्यात. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत येणाऱ्या दत्तक ग्राम येथील सन्माननीय लोकप्रतिनिधी गावचे सरपंच सौ सपना नावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन नावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. प्रतिक्षा कुमरे, सुरज इंगळे, सुरज जुमनाके, शंकर खामनकर, सुरज परचाके, विक्रांत भेंडाळे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील आठवणींना उजाळा दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद वेले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्य करिता यशा करिता शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राम धमके यांनी विद्यार्थ्यांना आपल्या समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचे स्मरण करून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एल. ए. मंजगवळी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अंकुश कोलते या विद्यार्थ्याने केले. आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन प्रा. देवी कांबळे यांनी केले. श्री जे. आर. चव्हाण, श्री संजय राठोड व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.