टॉप बातम्या

समाजसेवक गुलाब पुणेकर कडून ज्ञानसाधना वाचनालयास भारतीय संविधान भेट.

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर: समाजसेवक व शिक्षकांचा पुढाकाराने चार महिन्या अगोदर चालू करण्यात आलेल्या चिखलगाव येथील ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालयास विसापूरचे नेहमी समाजकार्यत सक्रिय असणारे गुलाब पुणेकर यांनी भारतीय संविधान पुस्तक भेट स्वरूपी वाचनालयास देण्यात आले. यावेळी विद्यार्थी हा समाजाचा कणा असतो आणि उत्तम विद्यार्थी, अभ्यासक घडण्यासाठी भारतीय संविधानाचे मूल्य, महत्त्व समजणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढावे, संविधानाची गोडी निर्माण व्हावी याकरिता भारतीय संविधान वाचणे व मूल्य आत्मसात करणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांचे संवाद साधताना गुलाब पुणेकर यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी विसापूर ग्रामविकास कृती समितीचे अध्यक्ष राजूभाऊ लांडगे वाचनालयाचे प्रमुख धूमने गुरुजी, चांदेकर गुरुजी, गुजरकर गुरुजी व मेश्राम साहेब यावेळी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();