रवी घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : संत जगन्नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व निर्गुडा नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेले वेगांव येथे काकड आरतीची परंपरा अनेक दशकांपूर्वी संतसद्गुरु ज्ञानगीरी महाराजांनी सुरु केली.पुढे परशुराम बुवा यांनी कायम राखली.हीच परंपरा पुढे गायकवाड गुरूजींनी चालवली.
1980 मधे विठ्ठल रखुमाई च्या मुर्तीची स्थापना करून हरिपाठ व काकड आरतीची परंपरा गावकऱ्यांनी आजही सुरू ठेवली.
पहाटे 5.00 वाजता समस्त गावकरी,महीला,बालमंडळी गांव स्वच्छ करून अंगण सडा-रांगोळी ने सजवून सर्व भाविक ज्ञानगिरि महाराज मठात जमून काकड आरतीला सुरुवात होते.संपुर्ण गावात दिंडी फिरवून निर्गुडा नदीचे दर्शन घेऊन दिवा धारेत सोडला जातो. पांडुरंगाची,महादेवाची,जगन्नाथा ची आरती करून काकड आरती केली जाते.
शेवटी राष्ट्रसंतांची राष्ट्वंदना व ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने आरतीची सांगता केली जाते.येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशी ला दि.06/11/22 ला आवळीव्रुक्ष पुजन (विष्णू पूजन) केले जाते.व कार्तिक समाप्ती ला काला करून काकड आरतीची समाप्ती केली जाते.
योगेश्वरजी कापसे यांचे घरून काकड आरती निघते.