टॉप बातम्या

शांतता समितीची मार्डी येथे बैठक

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मार्डी येथे आगामी पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर मार्डी ग्रामपंचायती मध्ये गुरुवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली...
मार्डी येथे आगामी सण पोळा, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मार्डी ग्रामपंचायती मध्ये गुरुवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष पदी सरपंच रविराज वानखेडे तर सचिव पदी पोलिस पाटील डॉ प्रशांत पाटील यांनी गावातील स्थितीचा आढावा घेत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
या बैठकीत शांतता समिती सदस्य भास्करजी धानफुले , मंगेश देशपांडे,सुरेश चांगले, प्रफुल झाडे, माणिक कांबळे, राजकुमार बोबडे, अनंता जुमडे, सूरज पंडीले, शेखर काळे, किसन जी चौधरी, विठ्ठल मांढरे, अतुल बोबडे यांनी सूचना मांडल्या.
सदरहू बैठकीत पोळ्यात जी प्रथम बैलजोडी काढणे व शेवटच्या जोडीने तोरण तोडणे ह्या पारंपरिक पद्धतीने देशपांडेची जोडी प्रथम व पाटलाची जोडी ने तोरण तोडण्यात यायचे. परंतु या वर्षी देशपांडेंकडे जोडी नसल्याने या वेळी हर्रास किंबहुना बोली न लावता ईश्वर चिट्ठी ने पहिली व शेवटची जोडी काढण्याचे सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
यावेळी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन उपस्थित नागरिकांनी बैठकीत दिले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();