कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलोरा फाट्यावर एका शिक्षिकेवर चाकूने हल्ला चढवून जखमी करण्यात आल्याची घटना आज 18 ऑगष्टला सायंकाळच्या सुमारास घडली.
वैशाली चल्लावार (वय अंदाजे 45) वर्षे रा. घुग्गुस असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेचे नाव असून तिला चंद्रपूर येथे उपचार्थ हलविण्यात आले आहे.
सविस्तर असे की, नायगांव (बु) या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर ती शिक्षिका आहे. शाळेचे वर्ग संपवून ती घुग्गुस या आपल्या गावाकडे जाण्याकरिता बेलोरा फाट्यावर बसची वाट पाहत असतांना तिच्यावर हा चाकू हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हा चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. ही शिक्षिका आधी दुचाकीने जाणे-येणे करायची. परंतु अशाच काही कारणास्तव तीने मोटरसायकलचा प्रवास बंद करून बसने जाणे येणे सुरु केले. दिवसाढवळ्या एका शिक्षिकेवर चाकू हल्ला करण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे.
यावरून महिला किती सुरक्षित आहे, याची प्रचिती येते. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.