टॉप बातम्या

अभिष्टचिंतन सोहळा: मोठ्या मनाचा दिलदार माणूस "नंदेश्वर आसुटकर"

           
             || वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील. पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्या करीताच करत नाहीत तर आपला जन्मदिवस साजरा होतांना ..दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल ह्याच भावनेतून साजरे केले जातात. आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे ग्रामीण,शहर मारेगावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाजात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. अर्थात मारेगाव नगर पंचायत नगरसेवक तथा काँग्रेस कार्यकर्ते श्री नंदेश्वर आसुटकर यांचा आज वाढदिवस...

तुमच्या पाठीशी हजारों सूर्य तळपत राहो..
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो..
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत !

भाऊसाहेब..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

आम्ही ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य, आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो! सेवा, धैर्य, संयम, कुशल संघटक व मोठ्या मनाचा दिलदार माणूस मारेगाव नगर पंचायत नगरसेवक श्री नंदेश्वर आसुटकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा..

शुभेच्छुक :- नंदेश्वर आसुटकर मित्र परिवार, मारेगाव तालुका 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();