टॉप बातम्या

निर्गुडा नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या


सह्याद्री चौफेर | न्यूज

वणी : तालुक्यात गळाफास, विष प्राशन यासह विविध घटनांची मालिका कायम असतांना शहरातील जैताई नगर येथील एका तरुणाने निर्गुडा नदीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
राकेश नामदेव मॅनावार (38) रा.जैताई नगर वणी असे उडी घेवून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
राकेश चे जैताई मंदिर समोर गुपचूप विक्री चे दुकान असुन, शहरात गुपचूप त्याचे खमंग आहे. दि.15 ऑगस्ट ला रात्री 7 ते 8 वाजताच्या सुमारास राकेश याने शहरानजीक असलेल्या निर्गुडा नदीत उडी घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच त्याची शोधाशोध केली असता,मध्यरात्री 2 वाजता चे सुमारास मोक्षधाम जवळ राकेश चा मृतदेह नदीत आढळून आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे दोन मुले, पत्नी, आई-वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

पुढील तपास सुरु आहे. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();