विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्य या वर्षी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा फडकावून व विविध कार्यक्रम घेऊन नरसाळा येथे साजरा करण्यात आला. या अंतर्गत येथील सरपंच श्री.संगीत मरस्कोल्हे गावातील जेष्ठ नागरिकांसह माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा बहुममान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नरसाळा येथे सरपंच श्री. संगीत मरस्कोल्हे यांनी ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्य ध्वजरोहणाचा बहुमन हा येथील उपसरपंच श्री.यादवराव पांडे यांना 13 ऑगस्ट, येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. शारदा पांडे यांना 14 ऑगस्ट व सरपंच यांनी स्वईच्छेने 15 ऑगस्ट चा ध्वजारोहणाचा बहुमान नरसाळा येथील माजी शैनिक श्री.अशोक गौरकर यांना देवून गावाकऱ्यात सर्वाप्रती सदभावना, प्रेम व आदर्श असल्याचे त्याचे मत दाखवून दिलेत.
नरसाळा ग्रामपंचायत मध्ये आज पर्यंत किती पदाधिकारी आलेत आणि गेलेत परंतु एकही पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत ध्वजारोहणाचा बहुमान गावातील जेष्ठ व्यक्तींना दिल्याचे ऐकले नाहीत किंवा पाहिले नाहीत. पण मात्र, विद्यमान सरपंचांनी तीनही दिवसाचा ध्वजारोहणाचा बहुमान गावातील देवून गावाकऱ्याचे मन जिंकले आहेत. या निमित्ताने माजी सैनिकांचे मनोबल वाढविले आहेत. सरपंच यांच्या या कार्या बद्दल सर्व गावात चर्चा होतानी दिसत आहेत.
या प्रसंगी मत व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा करणारे कर्मचारी हे गावाकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू नयेत म्हणून अहोरात्र मेहनत घेतांना दिसतात. मी माझा समोरील ध्वजारोहणाचा बहुमान मी माझ्या कर्मचाऱ्याला देईल तेव्हाच मला समाधान वाटेल असे बोलून ते भाऊक झाल्याचे दिसले. या वरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविषयी त्याचा मनात असलेले प्रेम,आदर दिसून आले.
या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन येथील ग्रामसेवक सचिन पाटील यांनी केले असून या कार्यक्रमाला येथील सरपंच श्री.संगीत मरस्कोल्हे, उपसरपंच यादवराव पांडे, शारदा पांडे, पुष्पा भुसारी, धनंजय तोडसे, कोंडूबाई कनाके, चंद्रकला किनाके, जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापिका निर्मला रोगे, चिडे सर, पेसा कोषा समितीच्या सदस्या उज्वला मडावी, बाळू सुरपाम, आरोग्य विभागाच्या कनाके मॅडम, कोलूरी आरोग्य कर्मचारी, येथील तलाठी थीटे साहेब, कोतवाल संदीप कुळसंगे व या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ग्रामपंचायत कर्मचारी मारोती कोहळे, गोपाळ उईके आणी शाळेतील विध्यार्थी व गावकरी उपस्थित होते.