टॉप बातम्या

वाढदिवसानिमित्त मार्डी येथे भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय मार्डी येथे भव्य मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात शिकलसेल,कान, नाक, घसा, मूळव्याध, डोळ्याचे आजार,जनरल तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण 300 पेक्षा जास्त लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी तालुका अध्यक्ष यांना यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, माजी तालुका अध्यक्ष अनंता जुमडे, सुरेश लांडे, फाल्गुण गोहोकर, शिवराज पेचे, उदास खिरटकर, रुपेश ढोके, शेख नबी, राहुल आत्राम,प्रवीण बोथले,राजू आस्कर,प्रवीण नन्हे,वामन चटकी,प्रशांत चौधरी,रोशन शिंदे,गणेश खुसपुरे, आशिष खंडाळकर,वसंता घोटेकर,अंकुश वैद्य व सुमित जुनगरी आदींनी भेटून अविनाश लांबट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महालॅब,आरोग्य सेवक,आशा गट प्रवर्तक,आशा सेविका,सफाई कामगार, नोंदणी व वाहनचालक यांच्या सौजन्याने हे आरोग्य शिबीर पार पडले.
वाढदिवसानिमित्त येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे अविनाश लांबट मित्र परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();