विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्य आयोजित पंचायत समिती मारेगाव च्या वतीने तालुका स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये वेशभूषा स्पर्धेमध्ये कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव ची विध्यार्थिनी कु. स्नेहल माईंदे हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर, कु.प्रिया मत्ते आणि निशा चौधरी या विध्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. तर सामूहिक नृत्य स्पर्धेमध्ये कला वाणिज्य कनिष्ठ महा. मारेगाव चमुने प्रथम क्रमांक पटकविला तसेच गीत गायन स्पर्धेमध्ये कु.स्वेता उमेश याटावर व कु. राजश्री रमेश लेडांगे या विद्यार्थिनीने द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. विजेत्या विध्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जिवन पा. कापसे, प्राचार्य श्री. हेमंत चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि भरीव यशाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();