कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चोपडा : लोकांना मदत करण्यात आणि प्रोत्साहन देण्यात कधीही मागे न पडणाऱ्या सूरमाज फाऊंडेशनने
2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावेळी श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडाचे डॉ.संदीप रमेशराव पवार, डॉ.भारत विजय कुमार जैन आणि डॉ. मोहम्मद रागीब यांना फार्मसीमध्ये व रूरल फाउंडेशन नंदुरबार संचलित वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे अक्कलकुवा येथील डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांना प्राणिशास्त्र विषयातील पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ (कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) मान्यता पराप्राप्त झाल्याबद्दल एस.बी. पाटील (समन्वयक, शेतकरी कृती समिती, चोपडा) श्री.मेहमूद मोहम्मद बागवान (उपनगर अध्यक्ष, चोपडा नगर परिषद, चोपडा) आरिफ शेख साहब (सामाजिक कार्यकर्ता), जियाउद्दीन काझी साहब (जिल्हा सामाजिक कार्यकर्ते) आरिफ कॉन्ट्रॅक्टर (कोहिनूर कन्स्ट्रक्शन) अभिनंदन केला आणि फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख म्हणाले तुम्ही कठोर परिश्रम करून हे स्थान मिळवले आहे, त्याच पद्धतीने तुम्ही कठोर परिश्रम करून आपल्या गावाचे आणि देशाचे नाव उंचावणारे असे विद्यार्थी तयार करावेत अशी आमची अपेक्षा आहे.
हा पाहुणचार सोहळा यशस्वी करण्यासाठी अबुलौस शेख जियाउद्दीन काझी साहब मुजाहिद-ए-इस्लाम शोएब शेख जुबेर बेग व सूरमज फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.