कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेला 'हर घर तिरंगा' हा उपक्रम अभिमानास्पद प्रसंशनीय आहे. आणि तिरंगा लावणारच, परंतु सध्याच्या परिस्थितीत 'हर घर रोजगारा'ची खूप अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे ही हर घर रोजगार योजना राबवावी. अशी मागणी अंकुश रुपाजी माफुर बोरी (खुर्द) ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ता मारेगांव यांनी केली आहे.
आजच्या बहुसंख्य युवकांसमोर करियर सोडले तर विशिष्ट कोणतेच ध्येय आणि आदर्श नाही आणि शीड नसलेले जहाज जसे याच्यासमवेत सागरात कोठेही भरकटत जाते, तसा आजचा युवक भरकटत आहे. चारित्र्याहीन आणि ध्येयशून्य अशी लाचार व्यक्तिमत्वे, भ्रष्ट राजकारणात आकंठ बुडून आपसात लोळत पडलेली राजकारणी मंडळी ही आजकालच्या युवकांसमोर आदर्श असल्याने आजचा युवक भांबावून गेला आहे.
स्पर्धा परीक्षाच्या नावाखाली अनेक युवा पिढी भरकटत असून दिशाहीन होत असतांना दिसत आहे. वाढते वय आणि भविष्याची चिंता यात गुंतून गेले आहेत. तो व्यसनाधीन होत आहे. तो मादक व्यसनाच्या आहारी गेला आहे.'आप' कमाईपेक्षा 'बाप' कमाई अन कष्टापेक्षा 'बिनकष्टाचा पैसा हे युवकांचे भूषण ठरत आहे. जीवघेणी स्पर्धा, झटपट पैसा कामावणे, डे साजरे करणे, पार्ट्या साजरे करणे, भ्रमदूरध्वनीचा दुरुपयोग करणे, सिगारेट, तंबाखू,मद्यपान, आणि आत्महत्या या अंधःकाराच्या खोल खाईत सर्व गोष्टीना आजचा युवक आणि युवती बळी पडल्या आहे.
हे सर्व बघता हर घर रोजगार राबविणे सध्या काळाजी गरज आहे. असे बोरी-खुर्द सामाजिक कार्यकर्ते अंकुश रुपाजी माफुर यांनी म्हटलं आहे.
"रक्तदान श्रेष्ठदान"... चला तर उद्या मारेगाव येथे