टॉप बातम्या

मारेगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त "भव्य रक्तदान शिबीर"

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साई मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दि.12 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. परंतु मागील महिन्याभरापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने 12 जुलै ला होणारे रक्तदान शिबीर हे पुढे ढकलण्यात आले होते.

सध्या पावसाने उसंत घेतली आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊसाने हाहाकार जुलै आणि ऑगस्ट मध्ये माजवला शेतीचे नुकसान, घरांची परझड झाली. अशा वातावरणात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सोमवार दि.15 ऑगस्ट 2022 ला भव्य रक्तदान शिबीरराचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजेपासून स्थळ जगन्नाथ महाराज मंदिर येथे होणाऱ्या रक्तदान शिबिराला तालुक्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मारेगाव साई मित्र परिवाराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();