विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : आघाडी सरकार च्या काळात वणी विधानसभा मतदार संघाचा विकास ठप्प पडला पडलेला होता. मात्र युती शासन सत्तारूढ होवून सुरु होताच पहिल्याच अधिवेशनात आमदार संजीव रेड्डीबोदकूरवार यांना वणी विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी 53 कोटी मंजूर करून घेण्यात यश आले आहे. पुढील एक वर्षाच्या काळात किमान 200 कोटींचा विकास निधी आणू असा विश्वास आमदार बोदकूरवार यांनी व्यक्त केला आहे. या काळात जितकी कामे झाली, तितकी कामे मागील 50 वर्षात झाली नव्हती. पाच वर्षाच्या काळात या विधानसभेत कोरोडो रुपयांचा निधी प्राप्त करून दिला होता. आता युती शासन येताच वणी सह मारेगाव तालुक्यातील खैरी कोसारा रस्ता, कोसारा खडकी आडेगाव रस्ता, खैरी करणवाडी रस्ता,मार्डी चोपण, चनोळा वनोजा गौराळा रस्ता,करणवाडी नवरगाव,गोधणी बोर्डा या रस्त्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या परिसरातील नागरिकात आनंदाचे वातावरण असून मा आमदारांचे अभिनंदन व आभार मानले जात आहे.