कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
नांदेड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बस मध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबदल सरकाराचे अभिनंदनच, पण ज्या दिव्यांगाना चालता येत नाही,जगात काय चालले ते दिसत नाही,ज्यांना ऐकु येत नाही, शासन अशा दिव्यांगाना व त्याच्या साथीदारास प्रवासात मोफत बस पासची सेवा बाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात यावा व सुविधा, देऊन ईश्वररूपी दिव्यांगाना शासनाने आधार द्यावा अशी मांगणी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचे सह कुंचेलीकर, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे, राजुभाऊ शेरकुरवार, अनिल रामदीनवार, विठ्ठल बेलकर इत्यादीनी केली.