रवि घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील मार्डी नांदेपेरा वणी हा नव्याने झालेल्या राज्यमार्गामुळे या मार्गांवर वेगाने,जलदगतीने किंबहुना निष्काळजीपणे चालणाऱ्या वाहनामुळे अपघातात वाढ झाली असून एका तरुण दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे.
अठरा दिवस त्याचे वर वेगवेगळ्या हॉस्पिटल येथे उपचार सुरु असतांना अखेर आज (ता.30 ऑगस्ट) ला त्याची प्राणज्योत मालवली. मृतक किशोर लटारी बोधाने (38) रा. मार्डी असे नाव आहे. किशोर हा वणी येथील श्रीपाद अटोमोबाइल्स मध्ये गेली 15 वर्षापासून मोटरसायकल दुरूस्तीची कामे करत होता. त्याच्या पाठीमागे वृद्ध आई वडील,पत्नी, तीन बहिणी,एक 10 वर्षांचा व एक 8 वर्षांचा मुलगा आहे.
सविस्तर असे की, दिनांक 12 ऑगस्ट रोजी किशोर बोधाने मोटरसायकल क्र एम एच 29 ए क्यू 7458 ने वणी वरून मार्डीकडे येत असतांना अशातच समोरून येणारी दुचाकी क्र एम एच 29 एजी 4092 चा चालक दिलीप चिकटे (25) रा. नांदेपेरा ता. वणी याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मृतकाचे दुचाकीला ठोस मारल्याने मृतक याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचाराकरिता वणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले, गंभीर असल्याने तिथून वर्धेच्या नामांकित दवाखान्यात हलविण्यास सांगितले, तेथून व्हेंटिलेटर अभावी त्याला नागपूर ला हलविण्यास सांगितले. नागपूर ला शासकीय व खासगी रूग्णालयात दाखल केले. खासगी रूग्णालयाच्या अती खर्चामुळे पुन्हा सावंगी मेघे येथे दाखल केले.पुन्हा मेघे सावंगी येथून यवतमाळ येथे रेफर केल्याने तो रस्त्यामध्ये मरण पावला. अशी तक्रार मृतकाच्या भाऊजीने किशोर वासुदेव घुगुल (45) रा. दहेगाव ता. वणी यांनी दि.30 ऑगस्ट 2022 ला सायंकाळी वरील आरोपीविरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 279,337,304 (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.